नाशिक येथे ८ शासकीय कंत्राटदारांवर आयकर विभागाची धाड !

सलग १५ घंट्यांहून अधिक घंटे चौकशी चालू !

नाशिक – येथील ६ ते ८ शासकीय कंत्राटदारांच्या निवासस्थानी आणि कार्यालय यांवर ३१ जानेवारी या दिवशी सकाळी ६ वाजल्यापासून नागपूर आणि मुंबई आयकर विभागांच्या वेगवेगळ्या पथकांनी एकाच वेळी धाड घातली. या कंत्राटदारांची सलग १५ घंट्यांहून अधिक घंटे चौकशी चालू आहे. ६० हून अधिक अधिकारी आणि ५० कर्मचारी ५५ वाहनांच्या ताफ्यासह स्थानिक पोलिसांच्या बंदोबस्तात येथे आले होते. आणखी २-३ दिवस हे धाडसत्र चालू रहाणार आहे. राज्यात महामार्ग, उड्डाणपूल उभारणारे, शासकीय अधिकारी, कर्मचारी यांची निवासस्थाने उभारणारे, कार्यालयांचे बांधकाम करणारे, क्रीडांगणे उभारणारे आणि वार्षिक उलाढाल १०० कोटी रुपयांच्यावर असणारे अशा कंत्राटदारांवर ही धाड घातली आहे.