२९१ कोटी रुपयांचे बोगस कर्ज वाटप !
अहिल्यानगर – नगर अर्बन को-ऑप बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी माजी अध्यक्ष अशोक कटारिया यांना पोलिसांनी अटक केली. ही अटक गृह विभागाचे पोलीस उपअधीक्षक हरिष खेडकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. कटारिया हे बँकेचे अध्यक्ष असतांना संचालक मंडळांच्या ७८ बैठकींना ते उपस्थित होते. प्रत्येक कर्ज प्रकरणाशी त्यांचा संबंध आहे. या बोगस कर्ज वाटप प्रकरणांमध्ये कर्ज वसुली करणे शेष आहे. त्यामुळे आरोपींना पोलीस कोठडी द्यावी. न्यायाधिशांनी त्यांना ३ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आली. (बोगस कर्ज देणार्या सर्व संचालक मंडळातील लोक, अधिकारी आणि बोगस कर्ज घेणारे कर्जदार यांची संपत्ती जप्त करून पैसे वसूल करावेत ! – संपादक) संचालक मंडळ, अधिकारी आणि कर्जदार यांनी संगनमत करून २९१ कोटी रुपयांचा घोेटाळा केला असल्याची तक्रार राजेंद्र गांधी यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात केली होती.