देहली येथील दंगलीच्या प्रकरणी २ धर्मांधांना ४ वर्षांच्या कारावासाची शिक्षा !

नवी देहली – वर्ष २०२० मध्ये झालेल्या हिंदूविरोधी दंगलीच्या प्रकरणी देहली न्यायालयाने ३१ जानेवारी २०२४ या दिवशी नूर महंमद उपाख्य नूरा आणि नबी महंमद या दोघांना दोषी ठरवून ४ वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावली. शिक्षा सुनावतांना न्यायालयाने सांगितले की, आरोपी द्वेष आणि लालसेने प्रेरित होते. नूर महंमद आणि नबी महंमद यांना विविध दुकानांची तोडफोड करणे आणि आग लावणे या प्रकरणात सहभागी असल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. या दोघांनी काही लोकांना लुटले होते आणि कलम १४४ चे (जमावबंदीचे) उल्लंघनही केले होते.

न्यायालयाने निकालात म्हटले आहे की, नूर महंमद याने दंगल घडवून आणली आणि दिलीप नामक व्यक्तीच्या दुकानाची तोडफोड केली आणि नंतर त्याला आग लावली. या वेळी त्याने दुकानातील भ्रमणभाषही पळवले. त्याने दुकानातील मालाचीही हानी केली. या वेळी ‘अशोक फोम आणि फर्निचर’ नावाच्या दुकानाचीही तोडफोड आणि जाळपोळ केली होती. तसेच रामदत्त पांडे, मनोज नेगी, सोनू शर्मा, पप्पू आणि अशोक कुमार यांच्या मोटारसायकली पेटवून देण्यात आल्या.

संपादकीय भूमिका

  • देहली येथील दंगलींना हिंदूंना उत्तरदायी धरण्याचे षड्यंत्र हिंदुद्वेष्ट्यांनी केले होते; मात्र देण्यात येणार्‍या निकालावरून दंगल कुणी घडवली, हे समोर आले आहे. याविषयी मात्र निधर्मीवादी गप्प आहेत !