देहलीतील कालकाजी मंदिरात व्यासपीठ कोसळल्याने झालेल्या चेंगराचेंगरीत १ जण ठार, तर १५ भाविक घायाळ !

तात्पुरत्या उभारलेल्या व्यासपिठावर पुष्कळ लोक चढल्याने अपघात !

देहलीतील कालकाजी मंदिरात कोसळलेले व्यासपीठ

नवी देहली – येथील प्रसिद्ध कालकाजी मंदिरात जागरणाच्या कार्यक्रमासाठी तात्पुरते व्यासपीठ उभारण्यात आले होते. त्यावर पुष्कळ लोक चढल्याने ते कोसळले. अचानक झालेल्या या अपघातामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊन चेंगराचेंगरी झाली. यात एका महिलेचा मृत्यू झाला, तर १५ भाविक घायाळ झाले. ही घटना २७ जानेवारीच्या रात्री साडेबाराच्या सुमारास घडली. या वेळी कार्यक्रमासाठी तेथे  साधारण १ सहस्र ६०० भाविक जमले होते. मंदिर प्रशासन आणि पोलीस यांनी गर्दी आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला; मात्र यात त्यांना यश आले नाही.