Tiger Raja Singh Announced : भारतात हिंदु राष्ट्र स्थापन होईपर्यंत मी माझ्या कुटुंबाचा त्याग करत आहे !

प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह यांची बागेश्‍वर धामच्या कार्यक्रमात घोषणा !

प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह

रायपूर (छत्तीसगड) : मी भारतात हिंदु राष्ट्र स्थापन होईपर्यंत माझ्या कुटुंबाचा त्याग करत आहे, अशी घोषणा तेलंगाणाची राजधानी भाग्यनगर येथील गोशामहल मतदारसंघातील भाजपचे प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह यांनी येथे केली. ते २३ जानेवारीला बागेश्‍वर धामच्या कार्यक्रमात व्यासपिठावरून बोलत होते.

१. टी. राजा सिंह म्हणाले की, छत्तीसगडमध्ये हिंदूंचे मोठ्या प्रमाणात धर्मांतर झाले आहे. भाजपने येथे धर्मांतरविरोधी शाखा स्थापन केली पाहिजे. जर आता आपण हिंदूंचे होणारे धर्मांतर थांबवले नाही, तर पुढची पिढी भगवान श्रीरामाला ओळखणारही नाही.

२. रोहिंग्या घुसखोरांविषयी टी. राजा सिंह म्हणाले की, मागील काँग्रेस सरकारने मोठ्या प्रमाणात रोहिंग्या घुसखोर मुसलमानांना देशात वसवले आहे. एवढेच नव्हे, तर रायपूरसह संपूर्ण छत्तीसगडमध्येही त्यांना वसवले आहे. हे घुसखोर नरभक्षक आहेत.

संपादकीय भूमिका

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी असा त्याग करणार्‍यांमुळेच देशात हिंदु राष्ट्र स्थापन झाल्याखेरीज रहाणार नाही !