परळ आणि सांताक्रूझ (मुंबई) येथे धर्मांधांकडून हिंदूंना धमकावण्याचा प्रयत्न !

मुंबई – २२ जानेवारी या दिवशी सर्व वसाहतींमध्ये श्री रामलला प्राणप्रतिष्ठेचा उत्सव साजरा होत असतांना परळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग या भागातील सिद्धी अहमद को-ऑप. सोसायटी येथे तरुण मित्र मंडळाच्या वतीने प्रभु श्रीरामाचे चित्र आणि नामजप असलेले ध्वज लावणे अन् लाडूवाटप असा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. त्या वेळी या इमारतीत रहाणारे मुफिज रईस अहमद आणि अन्य २ जण यांनी भगवे ध्वज काढले आणि बाचाबाची केली. त्यानंतर ‘ध्वज काढणे आणि शत्रुत्व वाढवणे अन् एकोपा टिकवण्यास बाधक कृती करणे’ या संदर्भात भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केल्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली.

सांताक्रूझ येथील गोळीबारनगर येथे २२ जानेवारीला पिंपळेश्‍वर मंदिरात पूजेचे आयोजन केले होते. या ठिकाणी सउद महमद कुरेशी हा सिगारेट ओढून मंदिरावर धूर सोडण्याची कृती करू लागला. त्या वेळी हिंदूंनी त्याला हटकले. त्या वेळी ‘मीरा रोड येथे जसे भगवे ध्वज गायब केले, तसे तुम्हाला गायब करीन’, अशी धमकी दिली. त्याच्या विरोधातही धमकी देणे, धार्मिक भावना भडकावणे असे गुन्हे नोंद करून कुरेशी याला अटक करण्यात आली.

संपादकीय भूमिका

  • सर्वत्र हिंदुत्वाचे आणि हिंदूसंघटनाचे वातावरण निर्माण झाल्याने धर्मांधांना श्रीरामाचा जयघोष सहन होत नसल्याने ते विरोध करू लागले आहेत. हिंदूंनी त्यासाठी स्वसंरक्षणार्थ काय सिद्धता केली आहे ?