|
ठाणे / पनवेल – २१ जानेवारीच्या रात्री पनवेल रेल्वेस्थानकावर भगवे ध्वज लावण्यासाठी धर्मांध मुसलमानांनी केलेला विरोध आणि मीरा रोड येथे शोभायात्रा मिरवणुकीवर केलेले आक्रमण यानंतर २२ जानेवारी या दिवशी महाराष्ट्रात ५ ठिकाणी धर्मांध मुसलमानांनी दंगल माजवण्याचा प्रयत्न केला. कल्याण, मीरा रोड (जिल्हा ठाणे), पनवेल, नागपूर आणि रावेर (जिल्हा जळगाव) या ठिकाणी त्यांनी हिंदूंवर आक्रमण केले.
कल्याण येथे २०० धर्मांधांकडून वाहने फोडून हिंदूंना धमक्या !
कल्याण – दुर्गाडी गडाच्या जवळ धर्मांध मुसलमानांनी ‘जय श्रीराम’ असे लिहिलेले ध्वज लावलेल्या गाड्यांची तोडफोड केली. २१ जानेवारीला २०० धर्मांधांनी येथील रेतीबंदर भागातील चिराग उपाहारगृहाच्या जवळ वाहनांची तोडफोड केली. ही वाहने अडवून त्यांना लाथा मारण्यात आल्या, वाहनावरील भगव्या ध्वजाच्या काठ्या तोडण्यात आल्या. तसेच काचा फोडून हिंदु वाहनचालकांना धमकावण्यात आले, असे त्यांनी सांगितले. (बहुसंख्य हिंदूंंच्या देशात त्यांच्या आराध्याच्या मंदिर पुनर्उभारणीचा आनंद साजरा होत असतांना त्यांच्यावर आक्रमण होणे दुर्दैवी ! – संपादक) वरील घटनेनंतर परिसरातील तणाव वाढला.
पोलिसांनी फोडलेली वाहने दुसरीकडे नेण्यासाठी किंवा त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी हिंदूंवर दबाव आणला, तसेच पोलीस अधिकारी सचिन गुंजाळ यांनी हिंदूंनाच ‘वाहतुकीची कोंडी होते म्हणून गाड्या बाजूला लावा. हा आपला सगळ्यांचा सण आहे’, असे सांगितले. अन्य एका पोलीस उपायुक्तांनी हिंदूंना पांगवण्याचा भरपूर प्रयत्न केला. ‘तुम्ही जाणूनबुजून हे करत आहात. ऐकत का नाही ?’, असेही पोलीस म्हणत होते. या सर्वाचे व्हिडिओ समोर आले आहेत.
बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ही घटना घडली. या वेळी विहिंप, बजरंग दल आदींचे ३०० हिंदुत्वनिष्ठ एकत्र होते. ‘मुसलमानांवर गुन्हे नोंद होत नाहीत, तोपर्यंत आम्ही येथून जाणार नाही’, अशी कणखर भूमिका घेतल्याने पोलिसांना नमते घेत शेवटी गुन्हे नोंदवणे भाग पडले. ‘गुन्हा नोंदवला जाईल आणि कारवाई करू’, असे त्यांनी आश्वासन दिले. (हिंदूंनी रोखठोक भूमिका घेतल्यानंतरच पोलिसांनी आक्रमणकार्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्याचे आश्वासन दिले. आता प्रत्यक्षात गुन्हा नोंद झाला का, याचीसुद्धा हिंदुत्वनिष्ठांनी निश्चिती केली पाहिजे. – संपादक)
Maharashtra : Attack on Hindus by J!h@d!$ in Kalyan, Mira Road (Thane), Panvel, Nagpur, Raver (Jalgaon).
3 people seriously injured in Panvel.
In Kalyan, police were busy consoling the Hindus.👉 The arrogance of these fanatical rioters shows they have no fear for the law and… pic.twitter.com/9XfY4j2cnB
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 23, 2024
पनवेल येथे धर्मांध मुसलमानांकडून पुन्हा आक्रमण !
२१ जानेवारीलाच धर्मांधांनी रेल्वेस्थानक परिसरात ध्वज लावण्यास विरोध केल्यावर त्यांच्यावर गुन्हे नोंद झाले असते आणि पोलिसांनी भगवे ध्वज तेथे लावू दिले असते, तर ही वेळ आली नसती !
पनवेल – २२ जानेवारी या दिवशी सकाळी पनवेलमध्ये दुचाकींची फेरी काढण्यात आली होती. त्यावर धर्मांध मुसलमानांनी आक्रमण केले. खारघरहून पनवेलच्या दिशेने जात असतांना पनवेल येथील मोहल्ला भागात फेरी पोचल्यावर त्यांनी मागील बाजूने आक्रमण केले. यात ३ हिंदू गंभीर घायाळ झाले. इनोव्हा आणि फॉर्च्यूनर गाडी, तसेच दुचाक्या यांची त्यांनी तोडफोड केली. एकाच्या पाठीवर, तर एकाच्या डोक्यावर वार या वेळी करण्यात आला.
या घटनेनंतर भाजप आमदार प्रशांत ठाकूर आणि शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्यासह ५० ते ६० कार्यकर्त्यांनी रुग्णालयात युवकांची भेट घेऊन आरोपींवर कारवाईची मागणी केली. शहारात मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे.
रावेर येथे हिंदूंच्या मिरवणुकीवर दगडफेक !
रावेर (जिल्हा जळगाव) – येथे हिंदूंच्या मिरवणुकीवर धर्मांध मुसलमानांनी अचानक दगडफेक चालू केली. यामुळे हिंदूंमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणी पोलिसांनी १५ जणांना कह्यात घेतल्याचे समजते. घटनेनंतर पोलिसांनी पोलीस बंदोबस्त केला.
नागपूर येथे ‘जय श्रीराम’च्या घोषणा देणार्या हिंदु मुलांवर मुसलमानबहुल परिसरातून जातांना चप्पलफेक आणि मारहाण !
पोलिसांनी आरोपींवर गुन्हे नोंदवून त्यांना शिक्षा होईपर्यंत पाठपुरावा घेतला पाहिजे !
नागपूर – २२ जानेवारी या दिवशी अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात साजरा होत असतांनाच येथील मोमीनपुरा परिसरातून काही हिंदु मुले ‘जय श्रीराम’च्या घोषणा देत जात होती. तेव्हा तेथील प्रार्थनास्थळातून त्यांना चप्पल फेकून मारण्यात आली. छोटी खदानमधील हनुमान मंदिराच्या दर्शनासाठी ही हिंदु मुले चालली होती. तिथून भगवाघर चौकात जातांना वाटेत मोमीनपुरा भागात वरील घटना घडली.
त्यानंतर मुलांनी तेथेच थांबून परिसरातील लोकांना जाब विचारायला आरंभ केल्यावर तिथे ३० हून अधिक धर्मांध मुसलमान जमले. त्यांनी १४ वर्षीय हिंदु मुलाला पुष्कळ प्रमाणात मारहाण केली. घायाळ मुलाला अन्य मुले भगवाघर चौकात घेऊन गेली. त्यानंतर शेकडो हिंदु भगवाघर चौकात जमा झाले. ते मोमीनपुरा भागाकडे जायला निघाले. यानंतर मध्य नागपुरात प्रचंड तणाव निर्माण झाला. २ घंट्यांहून अधिक काळ या भागात पुष्कळ तणावाची स्थिती होती. पोलिसांनी मध्यस्थी केल्याने तणाव निवळला. मोमीनपुरा परिसरात तातडीने शीघ्र कृती दल, दंगल नियंत्रण पथक, तसेच सशस्त्र पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला. काही वेळाने पोलिसांनी ध्वनीक्षेपकाद्वारे शांतता राखण्याचे आव्हान केले.
कल्याण येथे श्रीरामाच्या गाण्यात पालट करून धार्मिक तेढ निर्माण करणार्या धर्मांधाविरोधात गुन्हा नोंद !
मुसलमानांच्या धार्मिक भावना दुखावल्यावर ते थेट कायदा हातात घेतात, तर हिंदु वैध मार्गाने कारवाई होण्यासाठी प्रयत्न करतात, तरीही हिंदूंना असहिष्णु ठरवण्यासाठी पुरो(अधो)गामी राजकीय पक्ष, काही प्रसारमाध्यमे प्रयत्न करत असतात, हे लक्षात घ्या !
ठाणे, २३ जानेवारी (वार्ता.) – कल्याण येथील बारावे गावातील एका धर्मांधाने प्रभु श्रीरामचंद्रांवर सिद्ध केलेल्या गाण्यात हिंदूंच्या भावना दुखावतील असे शब्द घालून त्यात पालट केला आणि ते गाणे सामाजिक माध्यमांतून प्रसारित केले. या प्रकरणी बारावे गावातील रहिवासी श्याम मिरकुटे यांनी खडकपाडा पोलीस ठाणे येथे तक्रार प्रविष्ट (दाखल) केली होती. (असे कर्तव्यदक्ष नागरिकच हिंदु धर्माची खरी शक्ती आहेत ! – संपादक) तक्रार प्रविष्ट होताच खडकपाडा पोलिसांनी शाहनवाज महंमद शब्बीर शेख उपाख्य शानू शेख (वय ३१ वर्षे) या तरुणाच्या विरुद्ध गुन्हा नोंद केला असून पुढील अन्वेषण पोलीस करत आहेत.
संपादकीय भूमिका
|