२३ जानेवारीच्या दुपारपर्यंत ३ लाख हिंदूंनी घेतले रामललाचे दर्शन !

६ अंश तापमान असतांनाही मंदिराबाहेर जमले भक्त !

अयोध्या (उत्तरप्रदेश) – प्रभु श्रीरामाचे मंदिर उभारण्याचे हिंदूंचे स्वप्न २२ जानेवारी या दिवशी म्हणजे तब्बल साडेपाचशे वर्षांनंतर पूर्ण झाले. त्यानंतर आता २३ जानेवारीपासून मंदिर सर्व भक्तांसाठी खुले करण्यात आले आहे. अशातच आपल्या आराध्य देवतेच्या दर्शनासाठी २३ जानेवारीच्या दुपारपर्यंतच तब्बल ३ लाख हिंदूंनी दर्शन घेतले. सध्या ६ अंश तापमान असूनही दर्शन घेण्यासाठी लोक प्रचंड प्रमाणात रामनगरीत पोचले आहेत.