अयोध्येत श्रीरामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने विविध धार्मिक आणि आध्यात्मिक विधी होत आहेत. याचसमवेत देशभरात गेल्या काही दिवसांपासून रामनामजपाचे आयोजन आणि अन्य अनेक उपक्रम होत आहेत. अशा प्रकारे रामनामाचा जागर आणि आध्यात्मिक स्तरावरचे वातावरण देशभरात पहिल्यांदाच पहायला अन् अनुभवायला मिळत आहे. याचा परिणाम म्हणजे भारताची आध्यात्मिक दृष्टीने उन्नती होणार आहे आणि होत आहे. श्रीराममंदिरामुळे जे कधी साधना अथवा नामजप करत नाहीत, तेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष श्रीरामाचे नाव घेत आहेत. जे कुणी भक्तीभावाने श्रीरामाचे नाम घेतील त्यांना अलभ्य लाभ होणार आहे. या सगळ्यामुळे श्रीराममंदिराचे उद्घाटन आणि श्रीरामललाची प्राणप्रतिष्ठा हे दोन्ही आध्यात्मिक सोहळे अवर्णनीय झाले. – आधुनिक पशूवैद्य अजय जोशी (वय ६८ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६८ टक्के), ढवळी, फोंडा, गोवा