Nirmala Sitharaman : तमिळनाडूच्या द्रमुक सरकारकडून श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या थेट प्रक्षेपणाला घातली बंदी !

  • केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांचा आरोप !

  • तमिळनाडू सरकारने आरोप फेटाळला !

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन्

नवी देहली – अयोध्येतील श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या सोहळ्याचे तमिळनाडू राज्यात थेट प्रक्षेपण करण्यावर, पूजा, महाप्रसाद आदींवरही द्रमुक सरकारने बंदी घातली आहे, असा आरोप केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी सामाजिक माध्यमातून पोस्ट करून केला आहे.

द्रमुक सरकारने हा आरोप फेटाळला आहे. तमिळनाडूच्या हिंदु धर्मादाय खात्याचे मंत्री सेकर बाबू यांनी म्हटले की, द्रमुक पक्षाचे युवा संमेलन चालू आहे. त्यापासून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी भाजप अशा प्रकारची अफवा पसरवत आहे. मंदिरांमध्ये भक्तांना श्रीरामाच्या नावाने पूजा करण्यास, प्रसाद देण्यास कोणतीही बंदी नाही.