Ramlala Pran Pratishtha : श्रीरामाच्या डोळे उघडलेल्या मूर्तीचे छायाचित्र प्रसारित करणार्‍यांची चौकशी व्हावी !

  • श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांची मागणी !

  • प्राणप्रतिष्ठेपूर्वी मूर्तीचे डोळे दाखवता येत नाहीत, असे शास्त्र असल्याची दिली माहिती !

श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास

अयोध्या (उत्तरप्रदेश) – प्रसारमाध्यमे आणि सामाजिक माध्यमे यांद्वारे  अयोध्येतील श्रीराममंदिरात स्थापन करण्यात आलेल्या श्रीरामाच्या मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा केल्याच्या आधीचे म्हणजेच डोळे न झाकलेले छायाचित्र सर्वत्र प्रसारित झाले आहे. यावरून श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी टीका केली आहे.

आचार्य सत्येंद्र दास म्हणाले की, प्राणप्रतिष्ठा होण्यापूर्वी श्रीरामाच्या मूर्तीचे डोळे दाखवले जाऊ शकत नाहीत. मूर्तीचे डोळे कापडाने झाकण्यात आले आहेत. ज्या मूर्तीमध्ये रामाचे डोळे दिसतात ती खरी मूर्ती नाही. मूर्तीची निवड करण्यात आल्यानंतर मूर्तीचे डोळे झाकण्यात येतात. त्यामुळे ही मूर्ती खरी असेल, तर डोळे कुणी दाखवले आणि मूर्तीचे छायाचित्र प्रसारित कसे होत आहे ? याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी केली आहे.