‘स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे होऊन गेली; पण अजूनही शिक्षणाला या भारताच्या मातीचा गंध नाही, वैदिक धर्म संस्कृतीचा स्पर्श नाही. वास्तविक वैदिक धारणेवर अधिष्ठित, अशी निष्ठा ज्वलंत प्रखर हवी; पण ती पूर्ण उपेक्षित, संस्कार, आचार रहित आहे. वैदिक संस्कृतीच्या नरड्याला नख लावणारा हा पश्चिमी धारणेचा अभ्यासक्रम !
धर्मघना, आमच्या भारत राष्ट्राची जडणघडण करणारी जी युवाशक्ती आहे, तीच आज विध्वंसक बनली आहे. आमची युवा पिढी कुचकी, नासकी आणि सडकी झाली आहे. धर्मघना, आर्यावर्ताची प्राचीन शिक्षणपद्धत नष्ट करण्याच्या आंग्लाळलेल्यांच्या या योजनांना आम्ही तुझ्या कृपेने हाणून पाडू आणि युवा पिढीला पुन्हा तेजस्वी बनण्याचा मार्ग खुला करू !’
‘आमचे शिक्षण आईच्या गर्भापासून चालू होते आणि ते मृत्यूनंतरही संपत नाही.’
(साभार : मासिक ‘घनगर्जित’, नोव्हेंबर २०२१)