इंद्रायणी नदीचे पाणी प्रदूषणमुक्त करण्यासाठी ह.भ.प. मोहनानंद महाराज पुरंदवाडकर यांचे उपोषण !

आळंदी येथे आंदोलन करणारे ह.भ.प. मोहनानंद महाराज पुरंदवाडकर आणि त्यांचे सहकारी

आळंदी (जिल्हा पुणे) – येथे येणारे भाविक इंद्रायणी नदीत श्रद्धेने स्नान करतात, तसेच हे पाणी तीर्थ म्हणून प्राशन करतात. प्रत्यक्षात मात्र इंद्रायणी नदीचे पाणी येथील नागरिक आणि देहू-आळंदी येथे येणार्‍या भाविकांच्या आरोग्यास धोकादायक बनले आहे, अशी वस्तूस्थिती आहे. तरी इंद्रायणी नदीचे पाणी तात्काळ प्रदूषणमुक्त करावे, या मागणीसाठी इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाच्या विरोधात ह.भ.प. मोहनानंद महाराज पुरंदवाडकर आणि त्यांचे सहकारी यांनी उपोषण चालू केले आहे. (असे उपोषण का करावे लागते ? प्रशासनाला ते लक्षात येत नाही का ? – संपादक) या प्रसंगी ह.भ.प. दत्तात्रय साबळे महाराज, माजी नगराध्यक्ष बबनभाऊ गुंडरे, ह.भ.प. संजय महाराज कावळे यांसह अन्य उपस्थित होते.