हावेरी (कर्नाटक) येथे मुसलमान तरुणाकडून महाविद्यालयीन विद्यार्थिनीचे अपहरण

प्रतिकात्मक छायाचित्र

हावेरी (कर्नाटक) – काही दिवसांपूर्वीच हावेरीच्या हानगल येथे ७ मुसलमान तरुणांनी विवाहित मुसलमान महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिला धमकावले होते. आता हावेरी येथे आणखी एक घटना घडली असून महाविद्यालयात गेलेल्या एका युवतीचे एका मुसलमान तरुणाने अपहरण केले आहे.

हानगल शहरातील हंची ओणिय येथे ही घटना घडली असून ही मुलगी मल्लिलगार गावातील सरकारी महाविद्यालयात तृतीय वर्ष वाणिज्य शाखेच्या वर्गात शिकत होती. ‘नेहमी प्रमाणे मुलगी महाविद्यालयात गेली असतांना आफताब नावाच्या युवकाने तिचे अपहरण केले आहे’, अशी तक्रार हानगल पोलीस ठाण्यात तिच्या वडिलांनी केली आहे. सध्या पोलीस अन्वेषण करत आहेत.

संपादकीय भूमिका

  • कर्नाटकामध्ये काँग्रेसचे सरकार आल्यामुळे धर्मांधांचे अधिकच फावले आहे. काँग्रेसला मते देऊन सत्तेवर बसणार्‍या राज्यातील हिंदूंना आता याची जाणीव होत आहे का ?