मध्ये वाढला केशरी भात, जेवायला बसले रघुनाथ ।

सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

पूर्वीच्या काळी पहाटे जात्यावर दळण दळतांना स्त्रिया ओव्या गात असत. या ओव्यांमध्ये भगवंताचे स्मरण किंवा त्याला आळवणे हा मुख्य उद्देश असायचा. देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील श्रीमती मंदाकिनी चौधरी (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) यांनी अशाच ओव्या लिहिल्या आहेत. या ओव्यांमध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, संत आणि साधक यांचा उल्लेख आहे. त्यांच्यात या सर्वांप्रती असणारा भाव या ओव्यांतून लक्षात येतो.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
श्रीमती मंदाकिनी चौधरी

बसायला चांदीचा पाट, जेवायला सोन्याचे ताट ।
रांगोळी घातली दाट, उदबत्त्यांचा येतो घमघमाट ।
मध्ये वाढला केशरी भात, जेवायला बसले रघुनाथ ।
भोळ्या भक्ताचा ते खातील का भात ॥ १ ॥

सरली माझी ओवी, सरली म्हणू नका ।
ओवी गायची राज्यलोका (टीप १)
संत मंडळीला, गुरुदेवाला ।
ओवी गायची राज्यलोका ॥ २ ॥

सरती माझी ओवी, सरता नटले ।
गुरुदेवाला माझे आयुष्य चिंतुनी उठले (टीप २)
सरली माझी ओवी, आणखी घेणे आले (टीप ३)
देवद आश्रमात साधक दुणावले (टीप ४) ॥ ३ ॥

टीप १ – माझी ओवी अजून संपली नाही, हिंदु राष्ट्रात ती सर्वत्र गायली जायची आहे.

टीप २ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना उदंड आयुष्य चिंतून जात्यावरील दळण थांबवले.

टीप ३ – जात्यात घालायला पुढील धान्याचा घास हातात घेतला.

टीप ४ – सनातनच्या देवद (पनवेल) आश्रमात साधकसंख्या वाढली.

सूचना : ओवीतील गुरुदेव, रघुनाथ हे शब्द सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना उद्देशून म्हटले आहेत.

– श्रीमती मंदाकिनी विनायकराव चौधरी (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ८६ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल.(जुलै २०२३)

  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक