Ayodhya RamMandir PranPratishta : श्री रामललाला तंबूमध्ये पाहून गेली २३ वर्षे अविवाहित रहाणारे आणि चपला न घालणारे बिहारचे देबू दास !

रामभक्त देबू दास

किशनगंज (बिहार) – येथील देबू दास या रामभक्ताने गेली २३ वर्षे चपला घातलेल्या नाहीत. ते वर्ष २००१ मध्ये अयोध्येत श्रीरामजन्मभूमीच्या दर्शनासाठी गेले होते. तेथे त्यांनी श्री रामललाला तंबूमध्ये ठेवल्याचे पाहिल्यावर ‘जोपर्यंत येथे श्रीराममंदिर बांधले जाणार नाही, तोपर्यंत अविवाहित राहीन आणि पायांमध्ये चपला घालणार नाही’ अशी शपथ घेतली. तेव्हापासून ते अविवाहित असून अनवाणीच रहात आहेत. आता श्रीराममंदिराचे उद्घाटन होत असल्याने ते मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर चपला घालणार आहेत. देबू दास यांनी सांगितले की, श्रीरामाच्या कृपेने गेल्या २३ वर्षांत माझ्या पायामध्ये कधीही काटा रुतला नाही.

भाजपचे किशनगंजचे जिल्हाध्यक्ष सुशांत गोप यांनी सांगितले की, देबू दास यांनी अनेक अनुष्ठानांचे आतापर्यंत आयोजन केलेले आहे. त्यांनी २ सहस्र ५०० मृतदेहांवर अंत्यसंस्कारही केले आहेत. रक्तदानाच्या कार्यक्रमातही त्यांनी पुढाकार घेतलेला आहे.