पोषण आहारापासून वंचित ५८ लाख बालके, तसेच १० लाख गर्भवती महिला आणि स्‍तनदा माता यांवर परिणाम !

अंगणवाडी सेविकांचा संप चालूच !

प्रतिकात्मक चित्र

मुंबई गेल्‍या मासाहून अधिक काळ चालू असलेल्‍या अंगणवाडी सेविकांच्‍या संपाचा फटका अंगणवाड्यांमध्‍ये पोषण आहारापासून वंचित असलेल्‍या ५८ लाख बालकांना बसला आहे. जवळपास १० लाख गर्भवती महिला आणि स्‍तनदा माता यांनाही याचा परिणाम भोगावा लागत आहे. पुरेशा पोषण आहाराअभावी लाखो बालके कुपोषणाच्‍या विळख्‍यात सापडण्‍याची शक्‍यता निर्माण झाली आहे. तीव्र कुपोषित बालकांची संख्‍या वाढून (नवीन शासकीय भाषेत तीव्र अल्‍प वजनाची बालके) ७८ सहस्र ४३७ एवढी झाली आहे. मानधनवाढीच्‍या संदर्भात अंगणवाडी सेविकांनी ४ डिसेंबरपासून राज्‍यव्‍यापी कामबंद आंदोलन पुकारले आहे.

संपादकीय भूमिका :

राज्‍यातील बालके आणि महिला यांच्‍या आरोग्‍याची हानी करून अंगणवाडी सेविकांना काय मिळणार ? मानधनवाढीसाठी संप न पुकारता सनदशीर मार्गाचा अवलंब करावा !