रत्नागिरीत ‘राजस्थान क्षत्रिय राजपूत समाज कोकण मंडळा’ची स्थापना !
रत्नागिरी, ७ जानेवारी (वार्ता.) – येथील कारवांचीवाडी परिसरातील मरुधर समाज भवन येथे ३१ डिसेंबर २०२३ या दिवशी ‘राजस्थान क्षत्रिय राजपूत समाज कोकण मंडळा’ची स्थापना करण्यात आली. यामध्ये कोकण प्रांतातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या ३ जिल्ह्यांत रहाणारे राजस्थानचे राजपूत, हे राजस्थान क्षत्रिय राजपूत मंडळाचे सदस्य असतील. छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांना पुष्पहार अर्पण करून अन् दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाला प्रारंभ झाला.
या कार्यक्रमात तिन्ही जिल्ह्यांतील राजपूत बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या सर्वांनी ‘हिंदु धर्म’ आणि ‘सनातन धर्म संस्कृती’ यांचे रक्षण करण्याची शपथ घेतली आणि ‘आगामी काळात सशक्त संघटन उभारून देश अन् सनातन धर्म यांच्या रक्षणासाठी सदैव तत्पर राहू !’, या घोषणेने या कार्यक्रमाची सांगता झाली.
या वेळी नरपतसिंह कुपावत, देवीसिंह राणावत, मेविसिंह राणावत, रामसिंह जैतावत, रघुनाथसिंह चुंडावत, फतेसिंह राठोड, नारायणसिंह चुंडावत, रवींद्रसिंह राणावत, डुंगरसिंह भदावत, सुरेंद्रसिंह राणावत, महेंद्र सिंह जैतावत, बलवंतसिंह राठोड, भवानी सिंह जैतावत, राम सिंह राठोड, आजाद सिंह, नरपतसिंह इंदा, मदन सिंह राठोड, नरपतसिंह परिहार यांच्यासह राजपूत समाजातील बहुसंख्य सदस्य उपस्थित होते.