Bribing In CBFC : केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळात सौदेबाजी केल्याखेरीज चित्रपट प्रदर्शित होऊ शकत नाही !

चित्रपट दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांचा आरोप !

चित्रपट दिग्दर्शक अनुभव सिन्हा

छत्रपती संभाजीनगर –  चित्रपट ‘केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळा’च्या (सेन्सॉरच्या) कचाट्यातून सोडवण्यासाठी फार सौदेबाजी करावी लागते. पहिला, दुसरा, तिसरा टप्पा अशा सर्वच ठिकाणी सौदेबाजी झाल्याखेरीज चित्रपट प्रदर्शित होऊ शकत नाही. अनेक अडचणींवर मात करून चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोचत असतो, हे काही सोपे काम नाही, असा आरोप चित्रपट दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी येथे आयोजित नवव्या अजिंठा-वेरूळ चित्रपट महोत्सवात केला.

संपादकीय भूमिका

  • केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळावर सातत्याने अशा प्रकारचे आरोप केले जात असल्याने आता या आरोपांची चौकशी करणे आवश्यक आहे !