पलवल (हरियाणा) – येथे २ सख्ख्या बहिणींवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. पीडित मुलींनी नराधमांच्या विरोधात पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. (गुन्हेगारी, वासनांधता इत्यादी प्रकरणांमध्ये सापडणारे हे बहुतेक मुसलमानच असतात. यावरून एरव्ही अल्पसंख्य असलेले मुसलमान गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य असतात, हे दिसून येते ! – संपादक)
१. पीडित मुलींचे कुटुंब शेतात घर बांधून दुधाचा व्यवसाय करत होते. याच परिसरातील शेरखानचे कुटुंब पीडित कुटुंबाकडून दूध घेत होते. शेरखानची मुले अक्रम आणि शाहरूख पीडित कुटुंबातीली मुलींकडे वाईट हेतूने पहात होती.
२. पीडित मुलींचे वडील आजारी पडल्याने कुटुंबातील उर्वरित सर्व सदस्य त्यांना घेऊन रुग्णालयात गेले होते. या संधीचा अपलाभ उठवत रात्री ९ च्या सुमारास अक्रम, शाहरूख, जैद आणि तस्लीम या मुलींच्या घरात घुसले आणि पिस्तुलाचा धाक दाखवून दोन्ही सख्ख्या बहिणींवर सामूहिक बलात्कार केला.
३. याविषयी कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्याचा व्हिडिओही बनवला. या व्हिडिओच्या आधारे ते पीडित मुलींना पुन्हा शारीरिक संबंध ठेवण्यासाठी धमकावू लागले. दोन्ही बहिणींनी नकार दिल्यावर लहान बहिणीचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित केला.
४. जेव्हा पीडितेच्या भावाला प्रसारित झालेल्या व्हिडिओविषयी कळले, तेव्हा त्याने विरोध केला. तेव्हा या ४ जणांनी त्याला मारहाण केली आणि तोंड बंद ठेवण्याची चेतावणी दिली. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
संपादकीय भूमिकामुसलमानांमधील वासनांधता ! |