दोन्ही देशांत प्रत्यार्पणाचा करार नसल्याचे दिले कारण !
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानने मुंबईवर केलेल्या आक्रमणाचा मुख्य सूत्रधार हाफीज सईद याला भारताच्या स्वाधीन करण्याची मागणी फेटाळली आहे. या संदर्भात पाकमधील ‘डॉन’ वर्तमानपत्रात वृत्त प्रसिद्ध झाले आहे. या वृत्तात म्हटले आहे की, पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मुमताज झारा बलूच यांनी म्हटले की, पाकिस्तानला भारत सरकारकडून आर्थिक घोटाळ्याच्या प्रकरणात हाफीज सईद याच्या प्रत्यार्पणासंदर्भात विनंती करण्यात आली आहे. या संदर्भात आपण लक्षात घ्यायला हवे की, भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आरोपींच्या प्रत्यार्पणासंदर्भात कोणताही करार अस्तित्वात नाही.
(सौजन्य : WION)
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, ‘हाफीज सईद याला भारताच्या स्वाधीन केले जावे’, अशी विनंती आम्ही पाकिस्तान सरकारला केली आहे. त्यासाठी संबंधित सर्व कागदपत्रेही आम्ही सुपुर्द केली आहेत.
संपादकीय भूमिकापाककडून आतंकवाद्यांना भारताकडे सोपवण्याची अपेक्षाही करता येणार नाही. जोपर्यंत भारत पाकला नष्ट करत नाही, तोपर्यंत पाकमधील भारतविरोधी आतंकवाद्यांना शिक्षा होऊ शकणार नाही ! |