राहुल गांधी यांनी माफी मागावी ! – अजय सिंह सेंगर, सेंगर राजघराण्याचे वंशज

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याकडून क्षत्रिय राजघराण्याचा अपमान

राहुल गांधी

मुंबई नागपूर येथे काँग्रेसचा १३९ वा स्थापना दिवस पार पडला. या सभेला संबोधित करतांना काँग्रेसचे नेते राहुल गांधी म्हणाले, ‘‘राजे, महाराजे यांनी स्वातंत्र्याची लढाई लढली नव्हती. त्यांनी इंग्रजांसमवेत हातमिळवणी केली होती.’’ यावरून सेंगर राजघराण्याचे वंशज अजयसिंह सेंगर यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका करत त्यांनी ‘क्षत्रिय राजघराण्याचा अवमान झाल्याप्रकरणी क्षमा मागावी’, अशी मागणी केली आहे.

सेंगर जालौन’ राजघराण्याचे वंशज अजय सिंह सेंगर म्हणाले, ‘‘वर्ष १८१२ मध्ये जेव्हा सेंगरांनी ब्रिटीश कारवायांचा विरोध केला, तेव्हा कर्नल मार्टिनडेल त्यांना थोपवण्यासाठी शिपायांच्या तुकडीसह आले. सेंगरांनी ग्रेट डेक्कन रोडवर कूच करणार्‍या  शिपायांवर आक्रमण केले. त्यात अनेकजण मारले गेले. त्यानंतर सेंगरांनी शौर्य गाजवले. योद्धा म्हणून सेंगरांची ख्याती होती. त्यांनी दिल्ली सल्तनतीविरोधात त्यांच्या प्रदेशांचे रक्षण करत बाबरशी युद्ध केले. १९ व्या शतकात त्यांनी ब्रिटिशांशी लढा दिला. भारतातील ५६७ क्षत्रिय राजघराण्यांनी इंग्रजांशी संघर्ष केला. असे असतांना राहुल गांधी यांनी क्षत्रिय राजघराण्यांचा अपमान करणे अतिशय चुकीचे आणि देशद्रोही आहे. मला वाटते, हे महाराष्ट्रात आणि देशात कुणी सहन करणार नाही. राहुल गांधी यांनी या प्रकरणी माफी मागावी अन्यथा त्यांना देशात फिरू दिले जाणार नाही.’’