गुप्ता यांनी पत्नी-मुलांचा त्याग करून केला दुसरा विवाह !
हमीरपूर (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशातील हमीरपूर येथे नायब तहसीलदार आशिष गुप्ता यांनी मौधाहा भागात कार्यरत असतांना एका मशिदीत गुप्तपणे नमाजपठण करणे चालू केले. आशिष गुप्ता आता महंमद युसुफ झाल्याचे अन्वेषणातून समोर आले आहे. आधीच विवाहित आशिष गुप्ता यांना २ मुले आहेत; मात्र रुखसार नावाच्या मुसलमान तरुणीच्या प्रेमात पडून त्यांनी घर सोडले आहे.
सौजन्य भारत एक्सप्रेस
१. आशिष उपाख्य युसुफची पहिली हिंदु पत्नी आरती यांनी आशिष, रुखसार, रुखसार हिचे वडील, काका आणि लग्न लावणारे मौलवी यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली आहे. या प्रकरणी मौलवी आणि त्याचे साथीदार यांना अटक करण्यात आली आहे.
२. आशिष गुप्ता यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता रुखसारशी लग्न केले होते. त्या लग्नासाठी त्यांनी इस्लाम स्वीकारला होता.
संपादकीय भूमिकाउच्चशिक्षित असूनही धर्मशिक्षणाच्या अभावामुळे धर्मांतराला बळी पडणारे जन्महिंदू ! |