|
(‘घरवापसी’ म्हणजे पुनर्प्रवेश करणे)
फतेहपूर (उत्तरप्रदेश) – येथे बजरंग दल आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या साहाय्याने संजय या हिंदु युवकाचा शाबिया या मुसलमान युवतीशी विवाह करण्यात आला. शाबिया हिने या वेळी घरवापसी करून सीता हे नाव धारण केले. २७ डिसेंबर या दिवशी विवाह झाल्यानंतर दोघांना संसार चालू करण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी १० सहस्र रुपये दिले. त्यानंतर दोघेही देहली येथे रवाना केले. शाबियाच्या कुटुंबियांचा या विवाहाला विरोध होता.
२० वर्षीय साबिया (सीता) तीन वर्षांपासून संजयच्या प्रेमात होती. विवाह झाल्यानंतर ती म्हणाली की, ३ वर्षांपूर्वी मी अल्पवयीन होते. आज मी माझ्या जीवनाचे निर्णय स्वतंत्रपणे घेऊ शकते. दोघेही शेजारच्या गावात रहात होते. संजय तिच्या गावात आल्यानंतर त्या दोघांची भेट झाली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांनी विवाह करण्याचे निश्चित केल्यानंतर आधी न्यायालयात जाऊन विवाह करण्याचे ठरवले; परंतु शाबियाच्या कुटुंबियांनी तिथे येऊन गोंधळ घातला. बजरंग दल आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांना याविषयी समजल्यावर त्यांच्या साहाय्याने दोघांचा येथील मंदिरात वेदिक मंत्रोच्चारात विवाह लावून देण्यात आला.
संपादकीय भूमिका‘प्रेमाला धर्माचे बंधन नसते’, असे सांगून ‘लव्ह जिहाद’ला विरोध करणार्या हिंदुत्वनिष्ठांच्या कानपिचक्या घेणार्यांनी आता शाबिया आणि संजय यांचे जाहीर अभिनंदन केले पाहिजे ! |