ठाणे येथील ज्यू धर्मियांचे धर्मस्थळ बाँबने उडवण्याची धमकी !

संशयास्पद वस्तू न आढल्याने शोधकार्य थांबवले

ठाणे – येथील ‘सिने-गॉग’ हे ज्यू धर्मियांच्या धर्मस्थळ बाँबने उडवून देण्याचे संगणकीय पत्र प्राप्त झाले होते. यामुळे पोलिसांनी टेंभीनाका, जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरातील रस्ते बंद केले होते. पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ठाणे जिल्ह्यातील विविध भागांतून ज्यू धर्मीय या धर्मस्थळामध्ये प्रार्थनेसाठी येतात. या वेळी पोलिसांना या धर्मस्थळाच्या परिसरात कोणतीही संशयास्पद वस्तू न आढळल्याने पोलिसांनी शोधकार्य थांबवले.