पोटात चाकू खुपसण्याच्या मोठ्या गुन्ह्यावर ७ वर्षांनी शिक्षा होणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !

‘रागाच्या भरात पोटात चाकू खुपसून स्वत:च्या सख्ख्या पुतण्यास गंभीर घायाळ केल्याच्या प्रकरणी मालवण तालुक्यातील पोईप येथील सुभाष श्रीधर माधव या आरोपीला सिंधुदुर्गचे प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश संजय भारुका यांनी ३ वर्षे सश्रम कारावास अन् २ सहस्र रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली. २० मे २०१७ या दिवशी ही घटना घडली होती. या प्रकरणी मालवण पोलीस ठाण्यात सुभाष माधव यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता.’