Muslim Villain : हिंदु खलनायक दाखवल्यावर कुणी टीका केली नाही; मात्र मुसलमान खलनायक दाखवल्यावरच टीका होते !

‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाचे निर्माते प्रणय रेड्डी वांगा यांचे प्रत्युत्तर !

‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाचे निर्माते प्रणय रेड्डी वांगा व अभिनेते बॉबी देओल

मुंबई – हिंदी चित्रपट ‘अ‍ॅनिमल’वर विविध कारणांवरून टीका होत आहे. या चित्रपटात प्रचंड रक्तपात, हिंसाचार आणि अश्‍लीलता दाखवण्यात आली आहे. यामुळे ही टीका होत असतांना यातील खलनायक मुसलमान दाखवल्यावरूनही टीका होत आहे. या टीकेवर चित्रपटाचे सहनिर्माते, तसेच दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांचे बंधु प्रणय रेड्डी वांगा यांनी एका मुलाखतीत उत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, आम्ही ३ पत्नी असलेला आणि ८ मुले असलेला खलनायक दाखवला. तो अल्पसंख्यांकांच्या धर्मातील असल्याने लोकांनी त्यावर टीका करायला चालू केले आहे. गेल्या २० ते ३० वर्षांपासून चित्रपटात जेव्हा कपाळावर टिळा लावलेला हिंदु खलनायक दाखवला जात होता, तेव्हा कुणीच जाब विचारला नाही. मुसलमानांची ‘अल्पसंख्यांक’ अशी ओळख आहे. केवळ म्हणूनच काही लोक या चित्रपटाचा विरोध करत आहेत.

या चित्रपटात अभिनेते बॉबी देओल यांनी मुसलमान खलनायकाची भूमिका वठवली आहे. त्यात त्याला ३ पत्नी आणि ८ मुले असल्याचे दाखवण्यात आले आहे. यावरून ही टीका होत होती.