३ मूर्तींमधून निवडली जाणार एक मूर्ती !
अयोध्या (उत्तरप्रदेश) – येथील भव्य श्रीराममंदिराच्या गर्भगृहामध्ये श्रीरामाच्या बालस्वरूपाची कोणती मूर्ती स्थापित होणार, याचा निर्णय २९ डिसेंबरला होणार आहे. प्राणप्रतिष्ठेसाठी ३ मूर्ती बनवण्यात आल्या आहेत.
(सौजन्य : Good News Today)
कांचीचे शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती यांच्या सूचनेनुसार श्रीराममंदिर तीर्थक्षेत्र न्यासाचे एक पथक यांतील एक मूर्ती निवडणार आहे. दुसरी उत्सवमूर्ती म्हणून निवडली जाईल. ‘तिसरी मूर्ती कुठे ठेवायची ?’, हा निर्णयही याच दिवशी होणार आहे. मे २०२३ पासून अयोध्येत तिन्ही मूर्ती घडवल्या जात आहेत. हे काम राजस्थानचे शिल्पकार सत्यनारायण पांडे आणि कर्नाटकचे गणेश.एल्. यांनी केले असून भट्ट आणि अरुण योगीराज हे कोरीव काम करत आहेत.