मुंबई – मराठवाडयातील कुणबी नोंदींचा शोध घेण्यासाठी हैदराबादहून निजामकालीन जुनी ऊर्दू कागदपत्रे मागवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार आहे. राज्य सरकार सकारात्मक पद्धतीने आणि पूर्ण ताकदीने ओबीसींवर अन्याय होऊ न देता मराठा आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यामुळे उपोषण आंदोलन मागे घेतले जाईल. राज्यातील कुणबी नोंदी शोधण्यासाठी नेमलेल्या माजी न्या. संदीप शिंदे समितीचा तिसरा अहवालही लवकरच अपेक्षित आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी २० जानेवारीपासून मुंबईत बेमुदत उपोषणाची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
राममंदिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या कालावधीत अनेक उपक्रमांचे आयोजन होत असतांना त्या काळात जरांगे यांनी केलेले उपोषण अडचणीचे ठरणार आहे.