MP Santa Claus : मध्यप्रदेशातील उज्जैन आणि शाजापूर जिल्ह्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना सांताक्लॉज बनवण्यापूर्वी पालकांची अनुमती घ्या ! – शिक्षणाधिकार्‍यांचा आदेश

उज्जैन (मध्यप्रदेश) – मध्यप्रदेश राज्यातील उज्जैन आणि शाजापूर येथील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना सांताक्लॉज बनवण्यापूर्वी त्यांच्या पालकांची अनुमती घ्यावी, असा आदेश शिक्षणाधिकार्‍यांकडून देण्यात आला. अनुमती न घेता विद्यार्थ्याला सांताक्लॉज बनवून जर वाद झाला, तर त्याला संबंधित शाळा उत्तरदायी असेल, असे या आदेशात म्हटले आहे.

शाळांमध्ये नाताळच्या कालावधीत कार्यक्रम आयोजित केले जातात. त्या वेळी विद्यार्थ्यांना वेगवेगळी वेशभूषा केली जाते. त्या पार्श्‍वभूमीवर शिक्षणाधिकार्‍यांनी वरील आदेश दिला आहे.

संपादकीय भूमिका

हिंदु विद्यार्थ्यांनी नाताळ कशासाठी साजरा करावा आणि सांतकॉजची वेशभूषा का म्हणून करावी ? किती ख्रिस्ती शाळा गणेशोत्सव, दिवाळी, होळी आदी हिंदु सण साजरे करतात ?