अवैध बांधकामाकडे प्रशासनाचे लक्ष का नाही ? – सर्वसामान्य जनतेचा प्रश्न
नळदुर्ग (जिल्हा धाराशिव) – वनवासाच्या कालावधीत प्रभु श्रीरामाने येथे स्थापन केलेल्या मंदिराच्या समोर धर्मांधांनी मजार (मुसलमानाचे थडगे) बनवली आहे. वनवासाच्या कालावधीत प्रभु श्रीरामाने या ठिकाणी २ वेळा वास्तव्य केले होते. या समवेतच मंदिराच्या परिसरात प्रभु श्रीरामाने बाणाच्या साहाय्याने उभारलेले रामकुंड आहे. या कुंडाच्या जवळच पूर्वी मजार होती; त्याच ठिकाणी आता अवैधरित्या मोठी मशीद बांधण्यात आली आहे. या पवित्र कुंडातील पाणीही मशिदीमध्ये वापरले जात आहे. ‘मंदिर परिसरात होणार्या अवैध बांधकामाकडे प्रशासनाचे लक्ष का नाही ?’, ‘या माध्यमातून हिंदूंची पवित्र स्थाने नष्ट करण्याचे पुन्हा षड्यंत्र तर नाही ना ?’, असे प्रश्न सर्वसामान्य जनतेतून उपस्थित केले जात आहेत.
संपादकीय भूमिकामशिदीचे अवैध बांधकाम होत असतांना प्रशासन झोपले होते का ? यास उत्तरदायींवर सरकारने कठोर कारवाई करणे आवश्यक ! |