बेंगळुरू (कर्नाटक) – राज्यात सध्या गर्भलिंग परीक्षण, भ्रूणहत्या अशा अनेक अवैध घटना घडत असल्याचे उघडकीस आले आहे. या पाठोपाठ बालविवाह आणि किशोरवयीन मुली गर्भवती असणे या प्रकरणांची संख्याही वाढत आहे. राज्य सरकारने बालविवाह रोखण्यासाठी कायदा करून त्याचे काटेकोर पालन करण्याचे ठरवले आहे. तरीदेखील राज्यात एका वर्षात २८ सहस्र ६५७ किशोवयीन मुली गर्भवती असल्याचा विषय महिला आणि बाल कल्याण विभागाकडील माहितीतून उघडकीस आला आहे.
यादगिरी जिल्ह्यात ९२१ किशोरवयीन मुली गर्भवती असून सुरपूर तालुक्यात ३०० हून अधिक किशोरवयीन मुली गर्भवती आहेत. यादगिरी जिल्ह्यात बालविवाहाला आळा घातला जात नाही, हे स्पष्ट झाले आहे. महिला आणि बाल कल्याण विभाग आणि बाल रक्षण विभाग यांची नजर चुकवून बालविवाह होत असल्याचे उघड झाले आहे.
संपादकीय भूमिकासंपूर्ण देशातच बालविवाहांवर बंदी असतांना इतक्या मोठ्या प्रमाणात बालविवाह होईपर्यंत प्रशासन आणि पोलीस झोपले होते का ? |