‘जमियत उलेमा-ए-हिंद’चे अध्यक्ष मौलाना अर्शद मदनी यांचे विधान !
नवी देहली – प्रत्येक मशीद तिच्या जागी आहे. कोणतेही मंदिर पाडून मशीद बांधलेली नाही. सर्वेक्षण करण्यात आम्हाला कोणतीही अडचण नाही. या सर्वेक्षणातून ‘तेथे मशीद आहे’, हेच स्पष्ट होईल, असा आम्हाला विश्वास आहे, असे विधान ‘जमियत उलेमा-ए-हिंद’चे अध्यक्ष मौलाना अर्शद मदनी यांनी ज्ञानवापीच्या सर्वेक्षणावरून येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत केले.
मौलाना मदनी पुढे म्हणाले की, हा देश आमचा आहे. सर्वोच्च न्यायालय आमचे आहे. न्यायालय जो काही निर्णय घेईल, तो आम्हाला मान्य असेल. वर्ष १९९१ च्या धार्मिक पूजा स्थळ कायद्याने मुसलमानांना दिलासा दिला होता, तरीही ज्ञानवापीचे प्रकरण न्यायालयात पोचले. यावर सर्वच राजकीय पक्षांनी मौन बाळगले. यावर त्यांनी बोलायला हवे होते; कारण त्यांनीच हा कायदा बनवला होता.