ठाणे येथे तरुणीवरील आक्रमणाचे प्रकरण पोलिसांच्या विशेष अन्वेषण पथकाची कारवाई !

ठाणे, १८ डिसेंबर (वार्ता.) – येथे तरुणीचा अपघात आणि आक्रमण प्रकरणात पोलिसांच्या विशेष अन्वेषण पथकाने (‘एस्.आय.टी.’ने) अश्वजीत गायकवाड याच्यासह रोमिल पाटील आणि वाहनचालक सागर शेडगे यांना १७ डिसेंबरला रात्री ९ वाजताच्या सुमारास अटक केली. अपघातातील २ वाहनेही पोलिसांनी जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्या तिघांना ठाणे न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे. प्रत्येकी १५ सहस्र रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन देण्यात आला.
पीडित तरुणीची राज्याच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. त्याच वेळी या प्रकरणी कलम ३०७ जोडण्याचीही त्यांनी मागणी केली. अन्यथा हा विषय अधिवेशनात लावून धरणार असल्याची चेतावणी दानवे दिली आहे.
नर्हे (पुणे) येथे प्रतिबंधित गुटखा कह्यात : दोन धर्मांध कह्यात
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !
(म्हणे) ‘भारताने औषधांच्या खोक्यातून अफगाणिस्तानला ड्रोन पाठवले !’ : Pakistan Defense Minister Khwaja Asif
Ukraine-Russia War : युक्रेनने रशियाच्या १२ प्रदेशांवर डागले शेकडो ड्रोन !
‘म्युझिक कॉन्सर्ट’मध्ये यापुढे दारूला अनुमती नाही ! – योगेश कदम, गृहराज्यमंत्री
राज्यातील पोलीस ठाण्यांच्या आवारात महिला समुपदेशन केंद्रे स्थापन करणार !