‘सौ. शोभना नारखेडेकाकू (वय ५६ वर्षे) यांचे यजमान श्री. प्रवीण नारखेडे (वय ६४ वर्षे) हे सद्गुरु राजेंद्र शिंदे यांना व्यष्टी
साधनेचा आढावा देतात, तसेच मी नारखेडेकाकांच्या सेवेशी संदर्भातील सूत्रांचा सत्संग घेत असते. नारखेडेकाका व्यष्टी साधनेचा आढावा आणि सत्संग यांविषयी साधनेच्या संदर्भातील सूत्रे वहीमध्ये नोंद करून ठेवतात. नारखेडेकाका आणि काकू त्यांच्या निवासाच्या खोलीत गेल्यानंतर काकू काकांच्या व्यष्टी आढावा अन् सत्संग यांच्या वह्या वाचतात. त्यांतील साधनेच्या संदर्भातील मार्गदर्शन जाणून त्यांतील दृष्टीकोन समजून घेतात. काकूंना काही प्रश्न असल्यास त्याविषयी त्या काकांना विचारून घेतात. याविषयी सौ. नारखेडेकाकू माझ्याशी बोलत असतांना त्यांचा असा भाव होता, ‘मला प्रत्यक्ष सत्संगाला यायला मिळत नाही; पण काकांनी केलेल्या लिखाणाच्या माध्यमातून जे शिकायला मिळते ते शिकून घेऊया.’
– (पू.) सौ. अश्विनी पवार (सनातन संस्थेच्या ६९ व्या (समष्टी) संत, वय ३३ वर्षे), सनातन आश्रम, देवद. (१७.२.२०२३)