Surat Diamond Bourse : पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते सुरतमधील ‘सुरत डायमंड बोर्स’ व्यापारी संकुलाचे उद्घाटन  

पंतप्रधान मोदी

सुरत (गुजरात) – येथे बांधण्यात आलेल्या ‘सुरत डायमंड बोर्स’ या हिरे व्यापाराच्या संकुलाचे पंतप्रधान मोदी यांनी १७ डिसेंबर या दिवशी उद्घाटन केले. या संकुलामध्ये अनेक इमारती आहेत. हे संकुल अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय पेंटागॉनपेक्षा मोठे आहे. यात ४ सहस्र ५०० हून अधिक कार्यालये आहेत. याच्या निर्मितीसाठी ३ सहस्र ५०० कोटी रुपये खर्च करण्यात आले. हे संकुल ३५.५४ एकरमध्ये पसरले आहे. त्याचे बांधलेले क्षेत्र ६७ लाख चौरस फूट आहे.

या संकुलाच्या उद्घाटनापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी सुरत विमानतळावरील नवीन ‘एकात्मिक टर्मिनल’चे उद्घाटन केले.

सुरत डायमंड बोर्सची निर्मिती सुरतच्या हिरे उद्योगाने उत्पादन आणि व्यापार दोन्हींसाठी एक केंद्र म्हणून केली आहे. सुरतमध्ये जगातील ९२ टक्के नैसर्गिक हिरे बनतात.