श्रीकृष्णजन्मभूमीच्या सर्वेक्षणाचा अलाहाबाद उच्च न्यायालयाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून कायम

मथुरा ईदगाह कमिटीची याचिका फेटाळली !

मथुरा (उत्तरप्रदेश) – अलाहाबाद उच्च न्यायालयाने मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमीवरील ईदगाह मशिदीचे सर्वेक्षण करण्याचा दिलेला आदेश सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला. मथुरा ईदगाह कमिटीने उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधात आव्हान दिले होते.

सौजन्य न्यूज 18 अप उत्तराखंड 

या वेळी सर्वोच्च न्यायालयाने म्हटले, ‘या संदर्भातील उच्च न्यायालयाचा आदेश आमच्याकडे सादर करण्यात आलेला नाही, तर आम्ही यावर सुनावणी कशी करू शकतो ?’ त्यावर कमिटीने म्हटले, ‘सर्वेक्षणाच्या संदर्भात १८ डिसेंबरला सुनावणी होणार आहे. त्या वेळी कोर्ट कमिशनर नियुक्त करण्यात येणार आहे.’ त्यावर न्यायालयाने म्हटले की, त्या वेळी उच्च न्यायालयाच्या आदेशावर तुम्हाला काही समस्या असेल, तर तुम्ही सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊ शकता.