रत्नागिरी – अयोध्या येथे उभारण्यात येणार्या राममंदिराचा लोकार्पण सोहळा रत्नागिरी जिल्ह्यात साजरा केला जाणार आहे. २२ जानेवारी २०२४ या दिवशी होणार्या राममंदिराच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त जिल्ह्यातील ८४६ गावांमध्ये प्रशासनाच्या वतीने विद्युत् रोषणाई केली जाणार आहे. तसेच या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पहाण्याची सोय करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. पाली येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पालकमंत्री उदय सामंत पुढे म्हणाले, ‘‘राममंदिर ही आपली अस्मिता असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नातून हे मंदिर उभारले आहे. लोकार्पण सोहळा हा अविस्मरणीय क्षण असून या दिवशी जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या घरावर गुढी उभी करावी. रत्नागिरी जिल्ह्यात गावांमध्ये गावप्रमुख आणि अन्य सर्व मंडळींना गावाच्या प्रमुख देवळांमध्ये एकत्र जमून थेट प्रक्षेपणाचा लाभ घेता येणार आहे.’’