ब्रह्मगुप्त गुरुत्वाकर्षणाचा शोध लावणारा जगातील पहिला शास्त्रज्ञ ! – अक्षत गुप्ता

ब्रह्मगुप्त

‘वर्ल्ड हिंदु काँग्रेस’ला संबोधित करतांना प्रसिद्ध हिंदुत्वनिष्ठ लेखक श्री. अक्षत गुप्ता म्हणाले, ‘‘आपण सर्वांनी न्यूटनच्या गुरुत्वाकर्षण सिद्धांताविषयी ऐकले आहे; मात्र आपण भारतातील एका प्रतिभाशाली शास्त्रज्ञाचा इतिहास विसरलो. गुरुत्वाकर्षणाचा शोध लावणारा किंवा त्याविषयी बोलणारा न्यूटन हा पहिला शास्त्रज्ञ नव्हता; कारण न्यूटनच्या जन्माच्या १ सहस्र वर्षांपूर्वी ‘ब्रह्मगुप्त’ नावाची व्यक्ती होऊन गेली. ब्रह्मगुप्त यांनी ३ ओळी लिहिल्या होत्या ज्या सांगतात की, अग्नीचे काम जाळणे, पाण्याचे काम शांतता प्रस्थापित करणे आहे आणि पृथ्वीचे काम वस्तूंना तिच्याकडे आकर्षित करणे आहे. त्यांच्या मृत्यूनंतर ५ वर्षांनी भास्कर द्वितीय नावाच्या व्यक्तीने त्या ३ ओळी निवडल्या आणि त्याला ‘गुरुत्वाकर्षण’ असे संबोधले. काळाच्या ओघात आपण ते विसरलो आणि ‘ब्रह्मगुप्तांचा गुरुत्वाकर्षण सिद्धांत’ म्हणण्याऐवजी ‘न्यूटनचा गुरुत्वाकर्षण सिद्धांत’ असे म्हणू लागलो.’’