दुर्जन कसा असतो ?

दुष्ट अल्पविद्या असूनही ताठरपणे वागतो !

विषभारसहस्त्रेण गर्वं नायाति वासुकिः ।
वृश्चिकोबिन्दुमात्रेणोर्ध्वं वहति कण्टकम् ॥

अर्थ : सहस्रो भार विष असूनसुद्धा वासुकी सर्पाला गर्व नाही; पण विंचवाजवळ विषाचा एक थेंब आहे, तरी तो नांगी वर करून चालतो, तसा दुष्ट अल्पविद्या असूनही ताठरपणाने वागतो.

दुष्टांचे गुण, विद्या, शक्ती इतरांना त्रास देण्यासाठी असणे

दुष्ट दुसर्‍याचा मोहरीएवढा दोष पहातो; पण आपला बेलाएवढा दोष पहात नाही. दुसर्‍याची निंदा केल्याविना त्याला चैन पडत नाही.

मुखं पद्मदलाकारं वाणी चन्दनशीतला ।
हृदयं क्रोधसंयुक्त त्रिविधं धूर्तलक्षणम् ॥

अर्थ : मुख कमलदलाप्रमाणे, वाणी चंदनाप्रमाणे शीतल; पण हृदय मात्र क्रोधाने भरलेले ही धूर्तांची ३ लक्षणे आहेत.