‘साधकांकडून कार्यपद्धतींचे पालन होत नाही. त्यामुळे त्यांच्याकडून अनेक चुका होतात. यावर उपाय म्हणून पू. (सौ.) अश्विनीताईंनी (सनातनच्या ६९ व्या संत पू. (सौ.) अश्विनी पवार यांनी) सांगितले, ‘‘कार्यपद्धतीवर आपली श्रद्धा असावी. ‘कार्यपद्धत’ म्हणजे आपले क्रियमाण वापरणे. आपण आपले क्रियमाण वापरले नाही, तर देवाचे साहाय्य मिळत नाही. आपण कार्यपद्धतीचे पालन केले की, देवाचे साहाय्य मिळते. त्यातून आपली साधना होते आणि आनंद मिळतो. अध्यात्म जगायला शिकले की, आपल्याला त्यातला खरा आनंद मिळायला लागतो. तो आनंद जाणणे, म्हणजे ‘अध्यात्म.’
– कु. दीपाली राजेंद्र माळी, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१९.९.२०२१)