अकबरुद्दीन ओवैसी तेलंगाणा विधानसभेचे हंगामी अध्यक्ष
भाग्यनगर (तेलंगाणा) – एम्.आय.एम्.चे आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांची तेलंगाणाच्या विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून सत्ताधारी काँग्रेसकडून नियुक्ती करण्यात आली आहे. याला भाजपने आक्षेप घेतला आहे. येथील गोशामहल मतदारसंघातील भाजपचे आमदार टी. राजा सिंह यांनी ‘जोपर्यंत राजा सिंह जिवंत आहे, तोपर्यंत एम्.आय.एम्.समोर शपथ घेणार नाही. अकबरुद्दीन ओवैसीसमोर शपथ घेणार नाही’, अशी घोषणा केली आहे.
सौजन्य एएनआय
अल्पसंख्यांकांना खुश करण्यासाठी जाणीवपूर्वक मोठी चूक केली !
टी. राजा सिंह यांनी या संदर्भात एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, मला मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना विचारायचे आहे की, तुम्हालाही भारत राष्ट्र समितीचा (बी.आर्.एस्.चा) मार्ग अवलंबायचा आहे का ? वर्ष २०१८ मध्ये बी.आर्.एस्.ने अकबरुद्दीन ओवैसी यांना हंगामी अध्यक्ष बनवले होते, तेव्हाही आम्ही शपथ घेतली नव्हती. ओवैसी यांच्या कह्यात सरकारी भूमी आहेत. ओवैसी तेलंगाणात राहून हिंदूंना मारण्याविषयी बोलतात. अशा व्यक्तीसमोर शपथ घेणार का ? रेवंत रेड्डी म्हणायचे ‘बी.आर्.एस्., एम्.आय.एम्. आणि भाजप एक आहेत’; पण आता ‘एम्.आय.एम्.शी तुमचा संबंध काय आहे ?’, ते सांगा. विधानसभेत इतरही अनेक ज्येष्ठ आमदार होते, ज्यांना तुम्ही हंगामी अध्यक्ष बनवू शकला असता; मात्र अल्पसंख्यांकांना खुश करण्यासाठी तुम्ही जाणीवपूर्वक मोठी चूक केली. उद्या कोणत्याही परिस्थितीत भाजपचा एकही आमदार शपथ घेणार नाही.
संपादकीय भूमिका
|