नोव्हेंबर २०२३ मध्ये झालेल्या ‘वर्ल्ड हिंदु काँग्रेस’ला संबोधित करतांना प्रसिद्ध हिंदुत्वनिष्ठ लेखक श्री. अक्षत गुप्ता म्हणाले, ‘‘आम्ही आमच्या मुलांना ‘ए फॉर ॲपल’ आणि ‘बी फॉर बॉल’ असे का शिकवत आहोत ? त्याऐवजी आपण त्यांना ‘ए फॉर अर्जुन’ किंवा ‘बी फॉर भगवान’ का शिकवू शकत नाही ? जर बाहेरचे लोक आम्हाला ‘जी फॉर गॉड’ शिकवायला सिद्ध असतील, तर आपण आपल्या मुलांना ‘बी फॉर भगवद्गीता’ किंवा ‘जी फॉर गरुड पुराण’ शिकवायला सिद्ध असले पाहिजे !’’