नवी देहली – काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार आणि उद्योगपती धीरज साहू आणि त्यांचे सहकारी यांच्या झारखंड, बंगाल आणि ओडिशा येथील ठिकाणांवर आयकर विभागाने धाडी घाकून २०० कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. ९ पेट्यांमध्ये या नोटा ठेवण्यात आल्या होत्या. धीरज साहू हे मद्य निर्मिती करणारे आस्थापन ‘बलदेव साहू अँड ग्रुप ऑफ कंपनीज’शी संबंधित आहेत.
सौजन्य इंडिया टूडे
जनतेकडून जे लुटले आहे, ते परत द्यावे लागेल ! – पंतप्रधान मोदी
या संदर्भात पंतप्रधान मोदी यांनी या नोटांचे छायाचित्र पोस्ट करून ट्वीट केले आहे. त्यांनी म्हटले आहे, ‘जनहो, या नोटांच्या ढिगार्याकडे पहा आणि या नेत्यांच्या प्रामाणिकतेची भाषणेही ऐका. जनतेकडून जे लुटले आहे ते परत द्यावे लागेल. ही मोदी यांची ‘गॅरंटी’ आहे.’
संपादकीय भूमिका‘काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचार’ अशीच व्याख्या आता केली जात आहे, हेच या घटनेतून पुन्हा लक्षात येते ! |