हमासच्या प्रमुखाची पाकला भेट !
तेल अविव (इस्रायल) – इस्रायलशी युद्ध थांबवण्यासाठी हमासने पाकिस्तानचे साहाय्य मागितले आहे. इस्लामाबादला पोचलेला हमासचा प्रमुख इस्माइल हनी म्हणाला की, पाकिस्तान एक शूर देश आहे. ही मुजाहिदीनची (इस्लाम धर्मासाठी जिहाद करणार्या लोकांची) भूमी आहे. पाकची इच्छा असेल, तर तोे इस्रायलची आक्रमणे थांबवू शकतात. तो आम्हाला आधार देऊ शकतो.
गाझातील शाळा आणि रुग्णालये येथे मिळत आहेत शस्त्रास्त्रे ! – इस्रायल
दुसरीकडे इस्रायली सैन्याचे म्हणणे आहे की, सैनिकांनी गाझातील शाळा आणि रुग्णालये यांमधून शस्त्रे जप्त केली आहेत. याचा एक व्हिडिओही प्रसारित करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये सैनिक शाळेतून क्षेपणास्त्रे, ग्रेनेड आणि बंदुका बाहेर काढतांना दिसत आहेत.
गाझाची आरोग्यव्यवस्था कोलमडली ! – जागतिक आरोग्य संघटना
इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध पुन्हा चालू झाल्यावरून जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस गेब्रेयसस म्हणाले की, गाझा पट्टीतील आरोग्ययंत्रणा कोलमडली असून ती लवकरच पूर्णपणे नष्ट होईल. येथील ३६ पैकी केवळ १४ रुग्णालयांमध्ये लोकांवर उपचार चालू आहेत. उर्वरित रुग्णालये उद्ध्वस्त झाली आहेत. गाझामध्ये तत्काळ युद्धबंदीची आवश्यकता आहे.
संपादकीय भूमिकाआतंकवादी संघटना हमासला आतंकवाद्यांचा कारखाना असलेला पाक जवळचा वाटणारच. जगभरातील आतंकवाद्यांचे माहेरघर बनलेल्या पाकला नष्ट करण्यातच जगाचे भले आहे ! |