वायूदलाची विमाने म्हणजे उडत्या शवपेट्या !
भाग्यनगर (तेलंगाणा) – तेलंगाणाच्या दिंडीगुल येथे सकाळी भारतीय वायूदलाचे प्रशिक्षण देणारे विमान कोसळून झालेल्या अपघातात प्रशिक्षक वैमानिक, तर दुसरा शिकावू वैमानिक यांचा मृत्यू झाला. विमान कोसळल्यानंतर लगेचच त्याला आग लागली आणि ते संपूर्णपणे बेचिराख झाले.
A Pilatus PC 7 Mk II aircraft met with an accident today morning during a routine training sortie from AFA, Hyderabad. It is with deep regret that the IAF confirms both pilots onboard the aircraft sustained fatal injuries. No damage to any civil life or property has been…
— Indian Air Force (@IAF_MCC) December 4, 2023
गेल्या ८ महिन्यांतील वायूदलाचा हा तिसरा विमान अपघात आहे. यापूर्वी जूनमध्ये प्रशिक्षणार्थी विमान ‘किरण’ला अपघात झाला होता. मे महिन्यात ‘मिग-२१’ विमान कोसळून ३ वैमानिकांचा मृत्यू झाला होता.