गडचिरोली – नक्षलवाद्यांच्या सप्ताहाला २ डिसेंबरपासून प्रारंभ झाला. या सप्ताहाच्या पहिल्या दिवशी त्यांनी जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील अतीदुर्गम मीडदापल्लीजवळ एक फलक लावून प्रशासनाला चेतावणी दिली. त्यामुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. या फलकाची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी येऊन ते फलक काढून टाकले.
नक्षलवाद्यांकडून प्रतिवर्षी २ ते ८ डिसेंबरपर्यंत ‘पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी’ (पी.एल्.जी.ए.) या सशस्त्र संघटनेचा स्थापना दिवस साजरा केला जाते. या दिनानिमित्त साजर्या केल्या जाणार्या या सप्ताहात नक्षल्यांकडून पोलिसांवर आक्रमण होण्याची शक्यता असते. त्यामुळे पोलीस प्रशासनाकडून योग्य ती सावधगिरी बाळगली जाते. या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
संपादकीय भूमिकाजोपर्यंत भारतातील नक्षलवाद आणि माओवाद संपत नाही, तोपर्यंत त्यांच्या धमक्या पोलिसांना मिळत रहाणार ! सरकार आणि प्रशासन यांना आव्हान देणारा हा नक्षलवाद मुळासकट संपवणे हेच त्यांचे ध्येय असले पाहिजे ! |