कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील हत्तींच्या उपद्रवाच्या संदर्भात महाराष्ट्र प्रशासनाची हास्यास्पद अन् दुःखदायक कृती !

हत्तींची दहशत

‘कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत हत्तींची समस्या आहे. हे हत्ती येथे भातशेती आदी पिकांची बागायती यांची हानी करत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात हत्ती आले की, वन विभागाचे कर्मचारी त्याला कोल्हापूरच्या सीमेत पिटाळतात आणि कोल्हापूर येथे हत्ती गेले की, तेथील वन कर्मचारी त्यांना सिंधुदुर्गच्या सीमेत पिटाळतात. घाटकरवाडी येथे धरण असून आजूबाजूला उसाची शेती आहे. २८.१०.२०२३ या दिवशी आंबोली-आजरा या गावांच्या सीमेवर हत्तीने कोल्हापूर वन विभागाचे कर्मचारी प्रकाश पाटील (वय ५४ वर्षे) यांना सोंडेने उचलून भूमीवर आपटले आणि पायाने चिरडले. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.’