३ वाहनांमध्ये गोवंशीयांना कोंबून भरण्यात आल्याने ३२ गोवंशियांचा मृत्यू

गिरिडीह (झारखंड) – येथे गोस्तकरी करण्यात येणार्या ३ वाहनांना पकडण्यात आले. यात ११० गोवंशीय सापडले. २ कंटेनर आणि १ पिकअप व्हॅन यांमध्ये या गोवशियांना अक्षरशः कोंबण्यात आले होते. यामुळे ११० पैकी केवळ ७८ गोवंशीय जिवंत राहिले होते, तर उर्वरितांचा मृत्यू झाला होता. या वाहनांतून हे गोवंशीय बंगाल राज्यातून बांगलादेशमध्ये पाठवण्यात येणार होते. पोलिसांनी २ चालक आणि ६ गोतस्कर यांना अटक केली आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनंतर या वाहनांचा पाठलाग करण्यात आला होता. यामुळे तस्करांचे एक वाहन अपघात होऊन उलटले. यामुळेही काही गोवशियांचा मृत्यू झाला.
डहाणू (जिल्हा पालघर) येथे होणार जगातील सर्वांत मोठ्या कृषी बाजाराची उभारणी !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !