अहस्तोऽपि शिलामत्ति विनापादैश्च धावति।
गर्जत्युच्चैर्विना मुखं कोऽसौ नामा निरूपितः॥
१. प्रश्न : हात नसून पाषाणाचा चुरा करतो. पाय नसून चालतो. तोंड नसून मोठ्याने गर्जना करतो, असा हा कोण बरे ?
उत्तर : वायू
२. प्रश्न : आपल्या मार्गाने एकटाच कोण हिंडतो ?
उत्तर : सूर्य
३. प्रश्न : पुनःपुन्हा जन्माला कोण येतो ?
उत्तर : चंद्र
४. प्रश्न : शीत निवारणार्थ उपाय कोणता ?
उत्तर : अग्नी
५. प्रश्न : धान्याच्या मोठ्या पात्राचे नाव काय ?
उत्तर : पृथ्वी
६. प्रश्न : धान्याचे हे पात्र समृद्ध कोण करतो ?
उत्तर : गाय
– माधव पंडित
(साभार : मासिक ‘घनगर्जित’, मे २०१०)